Ad will apear here
Next
‘अग्रवाल’तर्फे सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया शिबीर
शिबिराविषयी माहिती देताना डावीकडून राजन कांदोई, राजेश टेकरीवाल, विजय मित्तल, डॉ. पंकज जिंदाल, राजीव अग्रवाल व लक्ष्मीकांत चामडीया.पुणे : ‘अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हँड सर्जरी (सौंदर्यवर्धक आणि हाताची शस्त्रक्रिया) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मोफत असून, १८ मार्च २०१८ रोजी ऑर्किड हॉस्पिटल येथे होणार आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध हँड सर्जन डॉ. पंकज जिंदल आणि ‘अग्रवाल’चे अध्यक्ष विजय मित्तल यांनी दिली.

या वेळी संस्थेचे राजीव अगरवाल, उमेश जालान, राजेश टेकरीवाल, लक्ष्मीकांत चामडीया, राजेंद्र अग्रवाल व राजन कांदोई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मित्तल म्हणाले, ‘शिबिराचे हे सातवे वर्ष आहे. आतापर्यंत या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डॉ. पंकज जिंदल आणि प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम व सहकारी या शिबिरात शस्त्रक्रिया करणार आहेत. वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण, जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे, जळलेले व्यंग,  भाजल्यामुळे येणारे व्यंग, अपघाताने आलेल्या विकृती आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात येणार आहे. स्त्री व मुलींना प्राधान्य देण्यात येणार असून, गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.’

या प्लास्टिक सर्जरी शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक आणि देवकीनंदन मोहनलाल अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत. गरजू रुग्णांनी सर्जरी पूर्व तपासणीसाठी १८ मार्च २०१८ रोजी सकाळी ८ वाजता उपाशी पोटी हजार राहावे; तसेच १५ मार्च २०१८पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

शिबिराविषयी :

दिवस : रविवार, १८ मार्च २०१८
वेळ : सकाळी आठ वाजल्यापासून
स्थळ : ऑर्किड हॉस्पिटल, एल स्क्वेअर बिल्डिंग, पोरवाल रोड, धानोरी जकात नाक्याजवळ, लोहगाव, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
वंदना पाठक - ७५८८१ ४८८०५
निर्मला मित्तल - ९०११० ०७६६९
ऑर्किड हॉस्पिटल - ७५०७२ ४७२४७ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZWMBM
Similar Posts
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुणे : अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर. एम्. धारीवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक्स आणि हॅंड सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, १६ डिसेंबर व रविवार, १७ डिसेंबर रोजी शिरूर येथील मदनबाई मातोश्री धारीवाल हॉस्पिटल येथे हे शिबिर होणार आहे, अशी माहिती शिबिराचे प्रमुख व सल्लागार डॉ
मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन पुणे : अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विनामूल्य प्लॅस्टिक सर्जरी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तीन जुलै २०१७ रोजी होणार असून, शिबिराचे हे पाचवे वर्ष आहे. आतापर्यंत जवळपास साडेचारशे व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे, अशी माहिती डॉ. पंकज जिंदल आणि अगरवाल ट्रस्टचे राजेश टेकरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली
अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबिर पुणे : ‘अगरवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, आर. एम. धारिवाल फाउंडेशन आणि गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ डिसेंबर २०१८ या कालावधीत मोफत प्लास्टिक, कॉस्मेटिक्स व हॅंड सर्जरी शिबिर आयोजित केले आहे. या हे शिबिर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल येथे होईल. शिबिराचे हे नववे वर्ष आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध हॅंड सर्जन डॉ
प्लास्टिक सर्जरी शिबिर पुणे : विकृतींमुळे जीवनात दुःखी व हतबल असण्याऱ्या लोकांच्या जीवनात पुन्हा नवी उमेद आणण्याचा संकल्प पुण्याच्या ‘अग्रवाल क्लब’ आणि प्रसिद्ध प्लास्टिक आणि हँड सर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी केला आहे. यासाठी शिरूरमध्ये दोन दिवसीय प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन १६ आणि १७ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. शिरूरमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language